श्री. अन्न योजना म्हणजे नेमकं काय?
हो, येथे मिळेल तुम्हाला सर्व माहिती.
तुम्हा सर्वांना माहिती आहे की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे धान्यांचे उत्पादन घेतले जाते. आपण मोठ्या प्रमाणामध्ये धान्यांचे उत्पादन घेऊन बाहेर देशांमध्ये निर्यात करतो. या धान्यापैकी एक म्हणजेच भरडधान्य. ज्याला आपण इंग्लिश मध्ये Millets म्हणतात. या भरडधान्यांना एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहे.
भरड धान्य लागवड घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. तुम्हाला माहिती असेलच की धान्याला संस्कृत मध्ये अन्नम म्हणतात तर आपण हिंदीमध्ये अन्न असे म्हणतात. भारतामध्ये कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना “श्री” हा शब्द वापरला जातो. याच धर्तीवर या योजनेला “श्री अन्न योजना” असे नाव देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत भरड धान्य उत्पादन वाढीसाठी, विक्रीसाठी आणि या धान्याची निर्यात वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
भरड धान्य म्हणजे काय?
मित्र तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की भरत धान्य म्हणजेच काय? या धान्यांमध्ये कोणकोणत्या धान्यांचा समावेश होतो. आपण जाणून घेऊ भरडधान्य आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली वेगवेगळी पिके.
भरड धान्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, नाचणी, बाजरी, राजगिरा, कांगणी यासारख्या धान्यांचा समावेश होतो. भरड धान्य ही शेतीसाठी उत्तम पीक मानली जातात. या धान्याचे उत्पादन घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता खूपच कमी लागते. या धान्यांचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापर केल्याने आपल्याला खूप फायदा होतो. जसं की स्थूलपणा, टाईप 2 मधुमेह, हृदयविकारा यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. ही धान्य आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात. कृषीप्रधान भारत देश जगातील वेगवेगळ्या देशांना या धान्याची निर्यात करतो. यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेले तर नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, ट्यूनिशिया, ब्रिटन तसेच अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे.
पूर्वी या भरड धान्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होत असे. त्यामुळे जुन्या काळातील लोकांचे आयुष्यमान खूप चांगले होते. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून, आजकालच्या या धावत्या जगात आपले आरोग्य संतुलित राहण्यासाठी आपल्या भोजनमध्ये भरड धान्याचा वापर होणे गरजेचे आहे.
आता आपण जाणून घेऊया श्री अन्न योजना म्हणजे नेमकं काय?
आपला भारत देश हा भरड धान्यामध्ये जगातील सर्वात मोठा उत्पादक देखील आहे आणि निर्यात देखील आहे. भरड धान्याच्या उत्पादनात आशिया खंडामध्ये भारताचा 80 टक्के वाटा आहे तरी एकूण जागतिक जागतिक उत्पन्नामध्ये भारताचा 20% वाटा आहे. याच धरतीवर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे त्याचा त्याची निर्यात वाढवणे यासाठी केंद्र सरकारने भर दिला आहे आणि त्यासाठी हैदराबाद येथे मिललेट्स रिसर्च सेंटर स्थापन करण्यात येणार आहे। या रिसर्च सेंटर मध्ये भरड धान्याचे उत्पादन कसे वाढेल यावर संशोधन करण्यात येईल.
आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्री अन्न योजनेची घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पात केली. देशामध्ये धान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे.
श्री अन्न म्हणजेच भरड धान्य इतकी फायदेशीर का मानली जातात?
- हवामानाशी अनुकूल
आजकाल तुम्ही पाहत असालच की हवामानामध्ये खूप जलद गतीने बदल होत असतात. या बदलांचा कृषी घटकांवर खूप परिणाम होत असतो. भरड धान्य ही कोणत्याही प्रकारच्या वातावरणाशी अनुकूल असतात आणि या बदलत्या वातावरणाचा त्यांच्यावर म्हणावा तितका प्रभाव पडत नाही. भरड धान्यासाठी कमी पाणी लागते. तसेच या धान्यांचा उत्पादन खर्च देखील इतर पिकांच्या तुलनेत खूप कमी आहे. ही पिक कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले उत्पादन देतात आणि कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो.
- आरोग्यासाठी लाभदायक तत्वे
भरडधान्य ही आरोग्यासाठी खूप लाभदायक मानली जातात. या धान्यांमध्ये खूप प्रमाणात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन बी कॉम्प्लेक्स व प्रोटीन इत्यादी पोषक तत्वे असतात. ही पोषण तत्वे आपणाला संभावित आजार पासून सुरक्षित राहण्यासाठी खूप मदत करतात. उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह यासारखे आजार, तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी भरड धान्य ही खूप उपयुक्त ठरतात.
भरड धांन्याविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये भारताची भूमिका.
भारताचा भरड धान्यांचा निर्यातीमध्ये आशिया खंडामध्ये जवळपास 80% तर जागतिक बाजारपेठेमध्ये 20 टक्के इतका वाटा आहे.
भरड धान्याचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे याविषयी जगभरातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे.
जगाच्या बाजारपेठेमध्ये भारत हे भरड धान्याचे एक जागतिक केंद्र बनले पाहिजे अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.
भारत हा या पिकांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि क्रमाक 2 चा निर्यातदार असल्यामुळे या धान्यांचे उत्पादन वाढलं तर त्याचा आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे.
श्री अन्न योजनेचा लाभ कसा घ्यायचा? योजनेस पात्र होण्यासाठीचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे.
सध्या तरी केंद्र शासनाकडून या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक पात्रता किंवा या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. सदर माहिती मिळताच तुम्हाला या लेखाद्वारे कळविण्यात येईल.
श्री अन्न योजनेअंतर्गत समाविष्ट असणारी पिके खालील प्रमाणे.
बाजरी- रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर करण्यासाठी उपयुक्त, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करते, प्रथिने अँटिऑक्सिडंटस आणि पोषक तत्त्वांनी भरलेली धान्य.
ज्वारी – पौष्टिक, थंड, गोड, बलदायी व त्रिदोषहारक. पोटॅशियम मॅग्नेशियम मिनरल्स यांचे प्रमाण जास्त, ब्लड प्रेशर नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त.
नाचणी- मधुमेह रुग्णांसाठी चांगली, नाचणीची भाकरी खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये मदत, हाडे मजबूत होतात.
राजगिरा- पौष्टिक व ग्लूटेन मुक्त धान्य, फायबर प्रथिने सूक्ष्म पोषक तत्वे यांचे भरपूर प्रमाण, वजन कमी करणे जळजळ कमी करणे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे यासारख्या आरोग्यविषयक फायद्याची संबंधित.
वरील श्री अन्न योजनेसंबंधित माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. याच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत जा. धन्यवाद !!!
योजनेचे नाव | श्री अन्न योजना |
सुरवात | 2023 |
योजनेचे उदिष्ट | भरड धान्य उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे |
योजनेमधील लाभार्थी | देशांतर्गत शेतकरी |
प्रस्तुत | निर्मला सीतारमण अर्थमंत्री भारत सरकार |
उद्देश्य | देशातील शेतकऱ्यांना मिलेट्स धान्य उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकारी योजना |
अर्ज करण्याचे ठिकाण व पद्धत | सध्या माहिती उपलब्ध नाही. |