प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना भारतातील हस्तकलाकार आणि कला कारागिरांसाठी एक नवीन संजीवनी
PM Vishwakarma Yojana आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने पीएम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने ही पंतप्रधान मंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत कारागीरांना प्रशिक्षण आर्थिक मदत कौशल्य विकास यासारख्या बाबींवर मदत करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे व कसा अर्ज करावा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
पीएम विश्वकर्मा या योजनेचा उद्देश :
PM Vishwakarma Yojana ला केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंजुरी मिळाली असून त्यासाठी 13000 कोटी रुपये इतका अपेक्षित खर्च आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशाच्या ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक हस्तकलाकार व कारागिरांना सहाय्य करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 18 पारंपारिक उद्योगांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
PM Vishwakarma Yojana उद्दिष्ट :
या योजनेचा एक मुख्य उद्देश म्हणजे हस्तकलाकार आणि कारागिरांची गुरुशिष्य परंपरा जपणे आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करणे, यानुसार हस्त कलाकारांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांच्या उत्पादनांचा आणि सेवेचा अधिक अधिक लोकांपर्यंत प्रसार करणे हा आहे.
PM Vishwakarma Yojana योजने अंतर्गत हस्त कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) आणि ओळखपत्र प्रधान केले जाईल. तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याज दराने कर्जपुरवठा देखील या योजनेअंतर्गत केला जाईल.
1.पहिल्या टप्प्यामध्ये रुपये एक लाखापर्यंत कर्ज दिले जाईल.
2.दुसऱ्या टप्प्यामध्ये रुपये दोन लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल.
तसेच या योजनेअंतर्गत कौशल्य श्रेणी सुधारणा, डिजिटल व्यवहार, विपणन सहाय्य, अवजारांसाठी अर्थसहाय्य यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये समाविष्ट असणारे उद्योग:
(i) सुतार (ii) होडी बांधणी कारागीर (iii) चिलखत बनवणारे (iv) लोहार (v) हातोडी आणि अवजार संच बनवणारे (vi) कुलूप बनवणारे (vii) सोनार (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) (x) चर्मकार (पादत्राणे कारागीर) (xi) मेस्त्री (xii) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर (xiii) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे (xiv) न्हावी (केश कर्तनकार) (xv) फुलांचे हार बनवणारे कारागीर (xvi) परीट (धोबी) (xvii) शिंपी आणि (xviii) मासेमारचे जाळे विणणारे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1.आधार कार्ड
2.उत्पन्नाचा दाखला
3.पॅन कार्ड
4.ओळखपत्र
5.पत्त्याचा पुरावा
6.जात प्रमाणपत्र
7.पासपोर्ट साईज फोटो
8.बँक पासबुक
9.वैध मोबाईल नंबर
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष:
-अर्जदार हा भारतीय नागरिक असावा लागतो.
-अर्जदार नमूद केलेल्या १८ उद्योग क्षेत्रामधील एकाच कार्यरत असावा.
-अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त व 50 वर्षापेक्षा कमी असावे.
-अर्जदाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
-अर्जदार योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असावा.
विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा?
PM Vishwakarma Yojana ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया. :
दिनांक 17 सप्टेंबर रोजी ही योजना सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती पुढील प्रमाणे आहे.
मोबाईल नंबर व आधार कार्ड सत्यापन प्रक्रिया :
सर्वप्रथम, आपण आपल्या जवळच्या CSC सेंटर (कॉमन सर्विस सेंटर) वर जाऊन तुमचे आधार कार्ड व मोबाईल नंबर सत्यापित करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची ओळख निश्चित करण्यास मदत होईल.
कारागीर नोंदणी प्रक्रिया :
तुमचे मोबाईल व मोबाईल नंबर व आधार कार्ड सत्य आपण झाल्यानंतर सीएससी सेंटर द्वारे तुम्हाला नोंदणी करावी लागेल. या प्रक्रियेद्वारे तुम्ही योजनेसाठी पात्र आहात हे सुनिश्चित केले जाईल.
विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरणे. :
कारागीर नोंदणी झाल्यावर, सीएससी केंद्र द्वारे तुम्हाला तुमची सर्व माहिती सबमिट करून या योजनेसाठी आवश्यक असणारा अर्ज करावा लागेल या आजा मध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमची व्यावसायिक माहिती आणि योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी जोडावी लागेल.
माहितीचे पडताळणी प्रक्रिया :
विश्वकर्मा योजनेमध्ये दिलेली माहिती तुमच्या ग्रामपंचायत किंवा शहरी स्थानिक निकाल द्वारे सत्यापित केली जाईल. यानंतर आणखी दोन टप्प्यांमध्ये तुम्ही दिलेल्या माहितीची सत्यापण केले जाईल व या सत्यापणामध्ये जर दिलेली माहिती ही बरोबर ठरली किंवा आढळून आली तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असा निष्कर्ष काढून तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
पीएम विश्वकर्मा योजना अर्ज स्वीकृतीं नंतरची प्रक्रिया:
ऑनलाइन अर्ज स्वीकृत झाल्यानंतर तुम्हाला पीएम विश्वकर्मा डिजिटल आयडी आणि प्रमाणपत्र म्हणजेच PM Vishwakarma Digital Id & certificate दिले जाईल. हे सर्टिफिकेट व ओळखपत्र तुमची ओळख आणि तुम्ही केलेली नोंदणी याची पुष्टी करेल.
प्रशिक्षण व प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरची प्रक्रिया:
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिले जाणारे विविध प्रकारचे लाभ मिळण्यासाठी तुम्ही पीएम विश्वकर्मा योजना पोर्टल द्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
पीएम विश्वकर्मा योजना 2024 निष्कर्ष:
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2018 20 ही भारतातील कारागीर समाजासाठी एक महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. ज्यामुळे कारागिरांना कौशल्य विकास आर्थिक मदत आणि सक्षमीकरणाची संधी मिळते. योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत कारागीर आपल्या कौशल्याचा विकास करून सामाजिक व आर्थिक उन्नती साधू शकतात.
अशाच प्रकारच्या माहितीजन्य व लाभदायक योजनेंची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.