कसे काढावे आभा कार्ड ?
आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नंबर यालाच आभा म्हणतात. याच योजनेचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून योजनेमध्ये भाग घेतलेल्या लोकांना एक डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाते. हा एक केंद्र सरकार पुरुस्कृत उपक्रम आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.
आभा कार्ड हे आधार कार्ड सारखेच असेल आणि त्या कार्डवर 14 अंकी युनिक नंबर असेल या नंबरचा वापर करून डॉक्टर रुग्णाची सर्व मेडिकल हिस्ट्री पाहू शकतात.
आभा कार्ड ही सेवा सुरू करण्याचं मूळ उदिष्ट हे आहे की रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपामध्ये एकत्रित करणे. हे कार्डचा वापर करून संबंधित रुग्णावर कोणत्या दवाखान्यामध्ये उपचार झाले होते, त्याला कोणता आजार झाला होता, त्यावर कोणती औषध देण्यात आली होती, आणि यावेळी रुग्णाला कोणकोणत्या समस्या आल्या होत्या तसेच आरोग्याविषयी असणाऱ्या शासनाच्या व इतर कोणत्या योजनेची तो जोडता गेलाय का? याविषयीची सर्व माहिती डिजिटल स्वरूपामध्ये या कार्डच्या माध्यमातून साठवली जाईल.
आभा हेल्थ कार्ड चे फायदे:
- रूग्णाला उपचारासाठी प्रत्यक्ष कागदपत्रे, अहवाल घेऊन जाण्याची गरज नाही.
- या योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
- आभा कार्ड मध्ये ब्लड ग्रुप, आजार यांची संपूर्ण माहिती असेल.
- तुमचा वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरेंस कंपनीला शेयर करता येईल.
- या योजने अंतर्गत ऑनलाइन उपचार. टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
आभा आरोग्य कार्ड कसे काढावे
चला मित्रांनो आता आपण आभा आरोग्य कार्ड कसे काढावे याविषयी समजून घेऊ.
- आभा आरोग्य कार्ड काढण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर भेट द्या.
- https://healthid.ndhm.gov.in/
- नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन यांच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर Create ABHA Number असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- पुढच्या पुढील पानावर गेल्यावर गेल्यानंतर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- तुम्ही आभा आरोग्य कार्ड काढण्यासाठी तुमच्या आधार कार्ड किंवा वाहतूक परवान्याचा वापर करू शकता.
- तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यावेळी तुम्ही वाहतूक परवान्याचा पर्याय निवडा.
- जर तुम्ही आधार कार्ड वापरून कार्ड काढत असाल तर तुम्ही पहिल्यांदा तुमचा आधार नंबर टाकावा. हा नंबर टाकल्यानंतर तिथे दिलेली सूचना काळजीपूर्वक पूर्ण वाचून घ्यावी.
- तुम्ही सहमत असाल तर तिथे उपलब्ध असणाऱ्या I Agree या वाक्यासमोरील चौकोनामध्ये टिक करावी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर खाली दिलेल्या रकान्यामध्ये टाकावे.
- त्यानंतर Next बटनावर क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल.
- मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डवरील तुमचे नाव, फोटो, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती तेथे दिसून येईल.
- त्यानंतर आधार ऑथेंटीकेशन सक्सेसफुल झाल्याची सूचना येईल नंतर तुम्ही तेथे असणाऱ्या NEXT बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि नेटवर क्लिक करायचे आहे.
- तसेच तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस ही आभा क्रमांकाशी जोडू शकता.
- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आभा नंबर तयार झाल्याची सूचना दिसेल व त्याखाली आबा नंबर नमूद केलेला तुम्हाला दिसेल.
- आता Link ABHA Address या रकान्यात क्लिक करा.
- इथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचे डिटेल्स दाखवले जातील त्या सर्व डिटेल्स नीट वाचून तपासून तुम्हाला आभा ऍड्रेस तयार करायचा आहे.
- खालील रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव किंवा जन्मतारीख टाकून आभार ड्रेस तयार करू शकता. तुमच्या लक्षात राहील अशी माहिती टाका आणि ही माहिती टाकून झाल्यानंतर create and link या रकान्यांमध्ये क्लिक करा.
- तुमचा आभा नंबर व आभा अॅड्रेस लिंक होईल व तसा मेसेज तुमच्या स्क्रीनवर येईल.
आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड किंवा त्याचा वाहतूक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
माहितीची गोपनीयता
तुम्ही आता आभा कार्ड विषयी संपूर्ण माहिती वाचली आणि तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की जर तुम्ही तुमची सर्व मेडिकल हिस्टरी शेअर करत आहे तर ती हिस्टरी कोणाकडे जाण्याची भीती तुम्हाला वाटत असेल किंवा तसा विचार तुमच्या मनात आलाच असेल. तर काही काळजी करू नका रुग्णाची गोपनीयता जपण्यासाठी सरकारने एक खूप चांगलं पाऊल उचलले आहे. तुमची मेडिकल हिस्टरी, तुमचे आरोग्यविषयक सर्व काही रेकॉर्ड किंवा तुम्ही कोणत्या दवाखान्यात भेट दिली होती, कोणते उपचार घेतले, कोणती औषधे घेतली याविषयीची माहिती ही तुमच्या संमतीशिवाय कोणीही जाणून घेऊ शकत नाही. कारण तुम्ही जो मोबाईल क्रमांक आभा हेल्थ कार्ड काढताना दिला होता त्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी येतो. तुमच्या मोबाईल नंबर वरील येणारा ओटीपी जोपर्यंत तुम्ही कोणाला देत नाही तोपर्यंत कोणी तुमची माहिती पाहू शकत नाही. त्यामुळे कोणतेही प्रकारचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर आला तर तो शेअर करताना तपासूनच शेअर करा.
तसेच तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की आभा हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यामध्ये काय फरक आहे. चला तर मग या दोन्ही कार्ड मधील फरक जाणून घेऊया.
- आयुष्यमान कार्ड हे हेल्थ इन्शुरन्स शी संबंधित आहे तर आभा हे डिजिटल हेल्थ अकाउंट आहे.
- आयुष्यमान कार्ड हे फक्त विशिष्ट वर्गासाठी, गरीब कुटुंबातील लोकांसाठी बनवलेले बनवलेली योजना आहे तर आभा कार्ड देशातील कोणताही व्यक्ती बनवू शकतो.
- आयुष्यमान कार्ड उपचार दरम्यान आर्थिक मदतीसाठी उपयुक्त आहे तर आभा कार्ड हे उपचार दरम्यान रुग्णाचा वैद्यकीय इतिहास समजून घेण्यासाठी वापरण्यात येते.
- आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे नियम आहेत. याउलट आभा कार्ड काढण्यासाठी कोणताही नियम लागू नाही.
आभा कार्ड चे मोबाईल एप्लीकेशन आहे का?
हो, शासनाने आभाकार्ड साठी मोबाईल ॲप्लिकेशन बनवले आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून नावाचे ॲप डाऊनलोड करू शकता. या ॲपचे पूर्वीचे नाव एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड असे होते.
आभा कार्डचा वापर करून तुम्ही वैद्यकीय इतिहास कसा काढू शकता?
जसं की वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक आभा कार्डसाठी एक 14 अंकी युनिक आयडी नंबर देण्यात आला आहे व एक QR कोड देखील तिथे उपलब्ध असेल. या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा वैद्यकीय इतिहास तपासू शकता.
वर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व तुम्ही तुमचे आभा कार्ड त्वरित काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा चांगला वापर करता येईल. धन्यवाद!!