मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये एक योजना जाहीर केली या योजनेचे नाव होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत वय वर्षे 21 ते 60 या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला, मुली यांना या योजनेअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्याचे काम शासन करत आहे. राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत. ही योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे तर चला पाहूया या योजनेविषयी सखोल माहिती.
Table of Contents
Toggleप्रथमत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Ladki Bahin योजनेची उद्दिष्टे समजून घेऊ.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्यक उपलब्ध करून देणे.
- राज्यातील सर्व महिलांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांवर त्या महिलांच्या व आधारित असणाऱ्या अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये :
- या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना धन राशी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे
- सर्व जाती जन्मातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- या योजनेअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा योजनेचा लाभ भेटणार आहे.
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे लाभार्थी.
- राज्यातील आर्थिक व दुर्बल घटकातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- वय वर्ष 21 ते 60 या वयोगटातील विधवा घटस्फोटीत विवाहित परितक्त्या व निराधार महिलांचे यामध्ये समावेश असेल.
Ladki Bahin मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे.
- सदर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- सदर महिला 21 ते 60 या वयोगटामध्ये असणे जरुरी आहे.
- सदर महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा घरी असणे आवश्यक आहे.
- सदर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
Ladki Bahin या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र :
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटोज
- उत्पन्नाचा दाखला
- विहित नमुन्यातील अर्ज
- रहिवासी पत्त्याचा पुरावा
तरी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेसाठी राज्यातील सर्व पात्र महिलांनी विहित नेहमी नमुन्यांमध्ये आज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा